मुंबई : पुरोगामी महाराष्ट्रात जादू-टोणा, काळी जादू आणि लिंबू-टाचण्यांची चर्चा होणं,त्यावर आरोप-प्रत्यारोप व्हावेत ही बाब शोभनीय नाही. मात्र, राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी राजकारण्यांकडून अशी विधाने करून एकमेकांवर चिखलफेक केली जात आहे. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंग्यातअद्याप राहायला न गेल्याबाबत एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. वर्षा बंगल्यावर काळी जादू झाली आहे का? असा सवाल उपस्थित करत काळी जादू या नेत्यांच्या मनात असल्याचा दावा राऊतांनी केला आहे.
हेही वाचा : चंद्रशेखर बावनकुळे वादात: सोन्याचा मुकुट का झाला चर्चेचा विषय?
राऊत यांनी काळ्या जादू बाबत केलेल्या वक्तव्यानंतर नितेश राणे यांनी त्यांची टर उडवत थेट मातोश्रीवर होणाऱ्या होमहवन, लिंबूंची जादू यावरून थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. यावर रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंनी वर्षा निवासस्थान सोडल्यानंतर तेथे टोपलीभर लिंबू मिळाल्याचे सांगितलं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
काय म्हणालेत रामदास कदम?
उद्धव यांनी वर्षा बंगला सोडला तेव्हा तिथे टोपलीभर लिंबू मिळाले होते. काळी जादू काय ते उद्धव यांना विचारलं पाहिजे. मातोश्रीवर त्याचा अनुभव जास्त असेल. म्हणून त्यांच्या डोक्यात हे असं असावं असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल राऊतांनी केला गौप्यस्फोट
याआधी फडणवीस यांच्या पहिल्या टर्मनंतर बंगला सोडताना काही खोडसाळ लिखाण भिंतीवर असल्यावरून राजकारण पेटलं होतं. आता पुन्हा वर्षा बंगला आणि त्यावरील जादूटोण्याच्या चर्चा रंगत आहेत.