१५ जुलै, २०२४ वर्धा : वर्ध्यात महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत लेखणीबंद आंदोलन केलंय. कनिष्ठ कर्मचाऱ्यांची रिक्त पद भरण्यात यावीत यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे. वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणा देत हे आंदोलन करण्यात आलं आहे. या लेखणीबंद आंदोलनात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी सहभागी झाल्यामुळे कामकाजावर परिणाम झाला आहे.