Monday, February 17, 2025 12:06:11 PM

What is Guiwell syndrome?
पुण्यात गुईलेन बॅरे सिंड्रोमचे 22 संशयित रूग्ण;  नेमका काय आहे हा प्रकार?

गुईवेल सिंड्रोम हा एक दुर्मिळ न्यूरॉजिकल डिसऑर्डर आहे, ज्यामध्ये शरीराच्या प्रतिकारशक्तीमुळे स्वतःच्या स्नायू आणि नर्व्हवर परिणाम होतो.

पुण्यात गुईलेन बॅरे सिंड्रोमचे 22 संशयित रूग्ण  नेमका काय आहे हा प्रकार



पुणे: पुण्यामध्ये गुईवेल सिंड्रोमचे (Guillain-Barré Syndrome - GBS) 22 संशयित रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग आणि महापालिका यंत्रणा सतर्क झाली आहे. संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी आयसीएमआरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही) येथे पाठवण्यात आले आहेत. यामुळे शहरातील आरोग्य यंत्रणांनी संभाव्य प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना सुरु केल्या आहेत.

गुईवेल सिंड्रोम म्हणजे काय?
गुईवेल सिंड्रोम हा एक दुर्मिळ न्यूरॉजिकल डिसऑर्डर आहे, ज्यामध्ये शरीराच्या प्रतिकारशक्तीमुळे स्नायू आणि नर्व्हवर परिणाम होतो. त्यामुळे स्नायू कमकुवत होणे, हालचाल करण्यात अडचण येणे, थकवा आणि गंभीर स्वरूपात श्वासोच्छवासाच्या समस्याही निर्माण होऊ शकतात. हा विकार सहसा एक = लाख व्यक्तींमागे एका व्यक्तीमध्ये आढळतो, मात्र पुण्यात एकाच वेळी 22 संशयित रुग्ण आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

महापालिकेची दक्षता आणि उपाययोजना
संशयित भागांत तपासणी मोहीम: एनआयव्हीचा रिपोर्ट आल्यावर महापालिका त्या भागांत आरोग्य तपासणी मोहिमा राबवणार आहे, जिथे संशयित रुग्ण आढळले आहेत.
लसीकरण आणि प्रतिबंधक उपाय: गुईवेल सिंड्रोम काही विशिष्ट व्हायरल इन्फेक्शननंतर होऊ शकतो. त्यामुळे आरोग्य यंत्रणा लसीकरण मोहिमेला गती देत आहेत.
रुग्णांवर उपचारासाठी तयारी: शासकीय रुग्णालयांत उपचारासाठी आवश्यक सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.


गुईवेल सिंड्रोमचा सामना कसा करावा ?
योग्य आहार: पोषणयुक्त आहाराचे सेवन करा, ज्यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतील.
व्यायाम आणि फिजिओथेरपी: नियमित फिजिओथेरपीमुळे स्नायूंच्या कमकुवतीवर मात करता येते.
प्रतिबंधक उपाय: इन्फेक्शनपासून बचावासाठी स्वच्छता पाळा आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आरोग्यदायी सवयी जोपासा.
आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला: थकवा, स्नायूंमध्ये कमकुवतपणा किंवा हालचाल करताना त्रास जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मानसिक आरोग्याची काळजी: दीर्घकालीन आजारांमुळे मानसिक ताण येऊ शकतो. त्यामुळे मनःशांतीसाठी ध्यानधारणा आणि ताणतणाव व्यवस्थापनाचे उपाय अवलंबा.


सम्बन्धित सामग्री