Sunday, April 20, 2025 06:29:45 AM

राष्ट्रवादीकडून विधान परिषदेवर कोणाची वर्णी लागणार?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधान परिषदेच्या उमेदवाराचं नाव आज जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादीकडून विधान परिषदेवर कोणाची वर्णी लागणार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधान परिषदेच्या उमेदवाराचं नाव आज जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज दुपारी अजित पवारांच्या उपस्थितीत देवगिरीवर बैठक होणार आहे. या बैठकीत एका नावावर शिक्कामोर्तब केलं जाणार आहे. कोअर कमिटीने निश्चित केलेल्या नावांपैकी काही नावांवर आज चर्चा होणार आहे. 

बैठकीनंतर उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात येणार असून सध्या पक्षाकडून विधान परिषदेसाठी कागदपत्रे गोळा करण्याच्या सूचना झिशान सिद्धकी, संजय दौंड, उमेश पाटील यांना देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळं या तिघांपैकी एकाला विधानपरिषदेवर संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा : भाजपच्या विधानपरिषदेच्या 3 उमेदवारांची नावं ठरली

अजित पवार कोणाला हेरणार ?
झिशान सिद्धकी, संजय दौंड, उमेश पाटील या तिघांची नाव राष्ट्रवादीकडून चर्चेत आहेत. मात्र या तिघांमधील एकाचे नाव राष्ट्रवादीकडून जाहीर केले जाणार आहे. विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी 27 मार्च रोजी मतदान होणार आहे. भाजपाकडून सर्वाधिक तीन नावांची घोषणा करण्यात आली आहे. दादाराव केचे, संजय केणेकर आणि संदीप जोशी यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून कोणाची नाव येणार जाहीर होणार याची उत्सुकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी एका नावाची घोषणा होणार आहे. 


सम्बन्धित सामग्री