अमरावती : एका मुकुटापायी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सध्या वादाच्या भोवऱ्यात आहेत. अमरावतीत माजी मंत्री प्रवीण पोटेंनी मंत्री बावनकुळे यांचे मुकुट घालून स्वागत केले होते. परंतु आता या मुकुटावरून सवाल उपस्थिती होत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
अमरावती जिलह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अमरावती दौऱ्यावर आले होते. यावेळी माजी मंत्री प्रवीण पोटे यांनी बावनकुळेंचं सोनेरी मुकुट घालून स्वागत केलं. याबाबत बातम्या येताच तो मुकुट सोन्याचा नसून पितळेचा असल्याचा खुलासा बानकुळेंनी केला. तर मुकुटाला सोन्याचा मुलामा असल्याचंही त्यांच्याकडून सांगण्यात आलं. तरीसुद्धा ही चर्चा थांबत नसल्याने बावनकुळे यांनी हा मुकुट परत केला आणि मुकुटातून प्राप्त होणाऱ्या आर्थिक रकमेतून समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचा सल्ला दिला. जर हा मुकुट सोनेरी नाही तर मग यातून आर्थिक रक्कम कशी मिळेल आणि समाजउपयोगी रक्कम कशी मिळेल असा सवाल उपस्थित होतं आहे. दरम्यान अमरावतीमध्ये हा मुकुट मात्र चांगलाच चर्चेत आला आहे.
हेही वाचा : पोलिसांनी तक्रार न घेतल्याने तृतीपंथीयाने केले असे कृत्य, पाहून बसेल धक्का
मुकूट सोनेरी की पितळेचा?
मंत्री तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना माजी मंत्री आणि भाजपाचे शहराध्यक्ष प्रवीण पोटे यांनी अमरावतीत स्वागतावेळी मुकुट घातला होता. हा मुकुट सोन्याचा असल्याच्या चर्चा सर्वत्र सुरू झाल्या. त्यानंतर मंत्री बावनकुळे यांनी ते मुकुट सोन्याचा नसून पितळे आहे आणि त्याला सोन्याचे मुलामा आहे असे सांगितले. बावनकुळेंनी केलेल्या वक्तव्यानंतरही मुकुट सोन्याचा असल्याच्या चर्चा थांबत नसल्यामुळे त्यांनी हा मुकुट परत केला. मुकुट विकून त्यातील पैशातून समाजउपयोगी काम करण्याचेही त्यांनी सांगितले. मात्र जर हा मुकुट पितळेचा आहे. तर तो विकून समाजउपयोगी काम कशी होतील असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा : "भिवंडीतील युवकाची आत्महत्या; जास्त व्याजाचा तगादा"