Sunday, April 27, 2025 07:25:11 PM

शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार? काय म्हणाले छगन भुजबळ?

महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. महाराष्ट्रात पक्षफुटी झाल्यानंतर त्याचवर अनेक राजकीय प्रतिक्रया येऊ लागल्या.

शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार काय म्हणाले छगन भुजबळ

महाराष्ट्र: महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. महाराष्ट्रात पक्षफुटी झाल्यानंतर त्याचवर अनेक राजकीय प्रतिक्रया येऊ लागल्या. त्यातच आता काका- पुतणे म्हणजेच शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का? यावर नेते छगन भुजबळ यांनी वक्तव्य केलंय. 

हेही वाचा: मनसेची फेररचना; अमित ठाकरेंना मोठी जबाबदारी

काय म्हणाले छगन भुजबळ? 

शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्यावर भाष्य केलं आहे. छगन भुजबळांना काका-पुतण्या एकत्र येण्याबाबत प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले, संदर्भात पंचांग वगैरे बघतो. मी आता जळगावमध्ये आलो आहे. इथं चांगले ज्योतिषी आहेत. त्यांना विचारतो, असं होईल का? असा प्रश्न करतो, असे भुजबळ यांनी म्हटलं आहे.

अजितदादा आणि जयंत पाटील यांच्या बंद चर्चेवरही छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील आणि माझीही अनेकदा चर्चा होते. विधानसभेत ते माझ्या बाजूलाच बसतात. आम्ही चर्चा करतो. आव्हाडही माझ्या बाजूलाच असतात. आम्ही अनेक विषयांवर चर्चा करतो. अजितदादा आणि जयंत पाटील यांनी चर्चा केली तर काय बिघडलं? आम्ही शत्रू नाहीत आम्हाला धडा मिळालेला आहे. ते आमच्या विरोधी पक्षात आहेत. त्यांची मते वेगळी आहेत, आमची वेगळी आहे, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.  

दरम्यान मंत्रिपदावरून डावलल्यामुळे गेल्या काही फिवसांपासून छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा आहेत. यानंतर त्यांनी काका- पुतणे म्हणजेच शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का? यावर भाष्य केल्याने राजकीय वर्तुळात आणखीनच चर्चेला उधाण आलंय. दरम्यान  पंचांग वगैरे बघतो. मी आता जळगावमध्ये आलो आहे. इथं चांगले ज्योतिषी आहेत. त्यांना विचारतो, असं होईल का? असा प्रश्न करतो, असे भुजबळ यांनी म्हटलं आहे.


सम्बन्धित सामग्री