‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ पुरस्कार सोहळा आकर्षणाचे केंद्र

मनोरंजन विश्वात वेगवेगळे पुरस्कार सोहळे होतात, पण सातत्य राखणाऱ्या काही सोहळ्यांचं आकर्षण आणि उत्सुकता कायम सिनेसृष्टीसोबतच रसिकांनाही असते. झी टॉकीजचा ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ हा मराठमोळा पुरस्कार सोहळा सर्वार्थाने सर्वांच्याच आकर्षणाचं केंद्र बनला आहे. ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ सुवर्णदशक सोहळा नुकताच मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील मान्यवरांच्या साक्षीने दिमाखात संपन्न झाला.
सुवर्णदशक सोहळ्याची सुवर्णझळाळी आणि मराठमोळ्या ग्लॅमरचा जबरदस्त जलवा रसिकांना या सोहळ्यात अनुभवायला मिळणार आहे. महाराष्ट्राची लाडकी अप्सरा सोनाली कुलकर्णी आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी गाण्यांवर धडाकेबाज परफॅार्मंस सादर केला. ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’च्या मुख्य सूत्रसंचालनाची जबाबदारी स्वप्नील जोशी आणि अमेय वाघ या दोन हरहुन्नरी अभिनेत्यांनी सांभाळली आहे. हा नेत्रदिपक सोहळा लवकरच झी टॅाकीजवर प्रसारीत होणार आहे.