Corona | राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ३२०वर

कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. मात्र तरीही कोरोना विषाणू नियंत्रणात येत नाहीये.
राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ताज्या आकडेवारीनुसार ३२० इतकी झाली आहे. कोरोना ग्रस्त रुगणांच्या आकडेवारीची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राजेश टोपे यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.
राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा मंगळवारी ३०२ इतका होता. पण बुधवारी तो आकडा थेट ३२० वर पोहोचला. यामध्ये मुंबईतून १६ आणि पुण्यातून २ नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत.