Sat. Nov 28th, 2020

महाराष्ट्राचं मँचेस्टर महापुरामुळे ठप्प!

महाराष्ट्राचे मँचेस्टर समजली जाणारी इचलकरंजी महापुरामुळे ठप्प झाली आहे. नेहमी खडखडाट करणारे यंत्रमाग महापुराच्या पाण्याने बंद पडलेत. त्याचे पार्ट बदलल्याशिवाय आता पर्याय नाही. त्यामुळे दोन ते तीन महिने हा उद्योगच ठप्प राहणार आहे. वस्त्रोद्योग नगरीची अवस्था महापुराने बिकट झाली आहे. सुमारे 50 कोटींचे नुकसान झाल्याचं पुढे येतंय.

महादेवी मिरजे या महिलेनं जिद्दीने उभा केलेला यंत्रमाग पाण्यात गेलाय. तिच्याकडे आता टाहो फोडण्याशिवाय हातात दुसरा पर्याय उरलेला नाही. अगोदरच कर्ज त्यात आर्थिक मंदी आणि आता महापुराचे संकट यामुळे सगळंच उद्ध्वस्त झालय.

संभाजी थब्बे यांची अवस्था याहून वेगळी नाही त्यांच्या सगळ्या मशिनरी पाण्यात गेल्यात.

यातून त्यांना सावरणं आता शक्य नाही.

सरकारने जर मदत नाही केली, तर मात्र आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याची उद्विग्नता त्यांनी व्यक्त करत आहेत.

या दोघांसह इचलकरंजीतल्या सुमारे हजारो यंत्रमाग उद्योग सध्या अडचणीत आहेत. त्यांचं पुनर्वसन झालं नाही तर इचलकरंजीचे मँचेस्टर नावच पुसलं जाईल, अशी अवस्था सध्या झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *