महाराष्ट्राचं देशाच्या वाटचालीत मोलाचं योगदान – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या राजभवनात क्रांतीकारकांच्या कार्याची चिरंतन जपणूक व्हावी यासाठी बनवण्यात आलेल्या विशेष दालनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी, नवीन राजभवन हे जनतेसाठी, राज्यपालांसाठी नवीन ऊर्जा देणारं आहे. आपण एका चांगल्या कामासाठी एकत्र आलो आहोत. जनतेसाठी हे राजभवन नाही, तर लोकभवन आहे. मी राजभवनात अनेकदा आलो आहे. राजभवनात तिरंगा फडकवताना पाहिला आहे. देश स्वातंत्र्याची ७५व्या अमृतमहोत्सव साजरा करत आहे. तर महाराष्ट्राचे देशाच्या वाटचालीत मोलाचं योगदान असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात क्रांतीसाठी बलिदान दिलेल्या अनाम वीरांना ही वास्तू समर्पित करताना आनंद होत आहे. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीने जगातील अनेक देशांच्या स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा दिली आहे. तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे योगदान देशासाठी अविस्मरणीय आहे. तसेच भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाने जगाला प्रेरणा दिले असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
‘मुंबई हे स्वप्नांचं शहर आहे’
महाराष्ट्राने देशाच्या वाटचालीत मोलाचे योगदान दिले आहे. मुंबईचा आधुनिक विकास होत आहे. मुंबई हे स्वप्नांचे शहर आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरे ही २१व्या शतकात देशाच्या विकासाची केंद्र बनणार आहेत. आपली भूमिका ही राष्ट्रीय हवी तर राष्ट्रीय विकासासाठी सर्वांचे योगदान हवं, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
‘इतिहासाबाबत आपण उदासीन आहोत’
आपल्या देशात खूप ऐतिहासिक वारसा आहे. गेली ७५ वर्ष राजभवन इथे आहे परंतु येथे बंकर असल्याचं अलीकडेच माहित पडलं आहे. राजभवनात एक भुयार आहे हे कळायला आपल्याला ७ दशके लागली आहेत. त्यामुळे देशाच्या इतिहासाबाबत आपण उदासीन का आहोत, अशी खंत पंतप्रधानांनी राजभवनातील कार्यक्रमात व्यक्त केली आहे.