Thu. Jan 27th, 2022

‘गुढी पाडव्या’बद्दल ‘या’ गोष्टी जाणून घ्या…  

महाराष्ट्रात मराठी नविन वर्षाचा प्रारंभ हा गुढी पाडव्याच्या सणापासून सुरूवात होतो. हा सण गुढी उभारून साजरा केला जातो. महाराष्ट्रीय संस्कृतीमध्ये गुढीपाडव्याला फार मोठे स्थान आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला साजरा केला जाणारा सण. पवित्र मानल्या जाणाऱ्या साडेतीन मुहर्तांपैकी गुढी पाडवा हा एक मुहूर्त मानला जातो.

 

साडे तीन मुहुर्तांपैकी एक गुढी पाडवा  

नव्या गोष्टींचा प्रारंभ, एखाद्या नव्या व्यवसायाची सुरूवात, खरेदी, सोन्याची खरेदी या दिवशी केलेली शुभ मानली जाते.

दारी गुढी उभारणं हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे.

हा सण महाराष्ट्रापणे कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्येही साजरा होतो.

कर्नाटकात ‘उगादी’ नावाने तर आंध्र प्रदेशात ‘संवत्सरादी’ या नावांनी हा सण साजरा होतो.

सिंधी लोक या उत्सवाला ‘चेटीचंड’ नावाने साजरा करतात.

आसाममध्ये बिहू, विशु केरळ यासारख्या वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो.

तेलुगु भाषेमध्ये ‘गुढी’ या शब्दाला लाकूड किंवा काठी याबरोबरच तोरण असेही संबोधले जाते.

या सणाच्या दिवशी म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठून सुर्योदयानंतर ही गुढी उभारली जाण्याची प्रथा रूढ आहे.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने संस्कृती दर्शवणा-या नववर्ष स्वागतयात्रा आयोजित केल्या जातात.

यावेळी पारंपारिक पोशाखातून मिरवणुका काढल्या जातात.

यामध्ये महिला, पुरुष, लहान मुले पारंपारिक पोशाखांत या मिरवणुकीत सहभागी होतात.

गुढीचे स्वरूप

गुढीसाठी उंच यासाठी काठी स्वच्छ धुवून त्याच्या एका टोकाला तांबडे, रेशमी वस्त्र किंवा साडी गुंडाळली जाते.

काठीला कडुनिंबाची डहाळी, आंब्याची पानं, फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी बांधून त्यावर कुठल्याही धातूचा तांब्या उपडा बसवला जातो.

ही उभारलेली गुढी नंतर दारात, अंगणात, गॅलरीमध्ये उभारता येते.

जिथे गुढी उभारली जाते त्या जागी स्वच्छ करून छानशी रांगोळी काढली जाते.

काठीला गंध, फुलं, अक्षता वाहिल्या जातात आणि गुढीची पूजा केली जाते.

यासाठी गुढीच्या समोर दुध, साखर आणि पेढ्यांचा नैवेद्य दाखवला जातो.

 

संध्याकाळी सुर्यास्तानंतर हळद, कूंकु, फुले वाहून गुढी उतरवण्याची प्रथा आहे.

हा काळ जास्त उष्णतेचा असतो. म्हणून या काळामध्ये कडुनिंबाच्या पानांचा आंघोळीच्या पाण्यात समावेश केला जातो.

तसेच या दिवसाच्या सुरूवातीला  ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर या सगळ्या जिन्नसांना एकत्रितपणे कडुनिंबाच्या पानासोबत खाण्याची प्रथा आहे, या वरून एक लक्षात येतं, की काळानुरूप सण हे साजरे केले जातात पण या सगळ्यांना एक वैज्ञानिक, आरोग्याच्या पार्श्वभूमीही पाहायला मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *