Thu. Aug 22nd, 2019

महात्मा फुले लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक

24Shares

जोतीबा फुले यांच्या लेखनीतून उतरलेले हे शब्द आजच्या युगातही अनमोल आहेत.

सत्याविन नाही धर्म तो रोकडा ‖ जनांशी वाकडा ‖ मतभेद

सत्य सोडू जाता वादामध्ये पडे ‖ बुद्धीस वाकडे ‖ जन्मभर

सत्य तोच धर्म करावा कायम ‖ मानवा आराम ‖ सर्व ठायी

मानवांचा धर्म सत्य हीच नीती ‖  बाकीची कुनीती ‖  जोती म्हणे ‖

नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे अशी  विचारधारा  मांडणारे ज्योतीराव गोविंदराव फुले यांची आज 11 एप्रिलला जयंती आहे.

आज महात्मा फुले यांची जयंती

सत्यशोधक समाजाचे सर्वेसर्वा महात्मा जोतीराव गोविंदराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 मध्ये झाला.

शेतकरी आणि  बहुजन समाजासाठी केलेल्या त्यांच्या मौल्यवान कार्यासाठी इ.स.1888 साली त्यांना जनतेने ‘महात्मा’ ही उपाधी बहाल केली.

‘शेतकऱ्यांचा आसूड’ या ग्रंथामधून त्यांनी शेतकऱ्यांवरचे  आपले विचार व्यक्त केले आहेत.

शेवटच्या पेशव्यांच्या काळामध्ये फुले यांचे वडील आणि त्यांचे काका फुले पुरवण्याचा व्यवसाय करत होते.

त्यामुळे गोऱ्हे हे त्यांचे मूळ आडनाव असतानाही फुले या नावाने ते ओळखले जाऊ लागले.

त्यांच्या काळामध्ये बहुजन समाजातील अज्ञान, दारिद्र्य पाहून त्यांनी सामाजिक सुधारणेसाठी प्रबोधन करण्याचे ठरवले यासाठी त्यांनी स्वत: पत्नीला शिकवण्याचा धाडसी निर्णय घेतला.

यासाठी इ.स. 1848 साली पुण्यामधील बुधवार पेठेमध्ये भिडे यांच्या वाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढण्यात आली.

शिक्षण क्षेत्रामध्ये मुलींना प्राधान्य देण्यासाठी महात्मा फुले यांचे योगदान अनमोल आहे.

सप्टेंबर इ.स.1873 रोजी जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली.

समाजामध्ये त्याकाळी जी विषमता होती तिच्याविरूद्ध आवाज उठवण्याचे या सत्यशोधक समाज सोसायटीचे ध्येय होते.

तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी त्यांची धडपड कितीतरी मुलींच्या आयुष्याला नवसंजीवनी देणारी ठरली.

या खडतर प्रवासामध्ये ‘शिक्षण आणि समता’ या सर्वसामांन्यांच्या प्रबोधनासाठी त्यांनी स्वत:चे आयुष्य झोकून टाकले.

त्यांच्या या कार्याला त्यांच्या जयंतीदिनी अभिवादन…..

24Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *