Sun. Aug 25th, 2019

महात्मा गांधी ‘वर्णद्वेष्टे’? ‘या’ विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा…

0Shares

महात्मा गांधी हे वर्णद्वेष्टे असल्याचं कारण देत त्यांचा पुतळा रातोरात हटवण्यात आला आहे. ही घटना अफ्रिकेतील घाना विद्यापीठात घडली आहे. आफ्रिकेतील देशवासीयांनी महात्मा गांधी यांना ‘वर्णद्वेष्टे’ ठरवत त्यांचा पुतळा हटवण्यात आला.

भारत आणि घाना यांच्या मैत्रीचे प्रतीक म्हणून घाना येथील विद्यापीठात 2 वर्षांपूर्वी महात्मा गांधींचा पुतळा उभारण्यात आला होता. मात्र आता महात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत त्यांचा पुतळा हटवण्यात आला आहे.

घाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी गांधींजींना ‘रेसिस्ट’ म्हणत या पुतळ्याला कडाडून विरोध दर्शवला. विद्यापीठातून गांधींचा पुतळा हटवण्यात यावा अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. हा पुतळा हटवण्यासाठी 2 वर्षांपासून विद्यार्थी आणि प्राध्यपकांची आंदोलनं होत होती. त्यानंतर अखेर विद्यापीठाने हा पुतळा हटवला.

का हटवण्यात आला महात्मा गांधीजींचा पुतळा ?

  • महात्मा गांधी यांनी त्यांच्या सुरुवातीच्या लेखांमध्ये अफ्रिकी नागरिकांना ‘काफिर’ म्हटल्याचा आरोप आहे.
  • तसंच आफ्रिकन लोकांपेक्षा भारतीय श्रेष्ठ आहेत, असा दावाही त्यांनी केला होता.

याच वाक्यांचा संदर्भ देऊन विद्यापीठातील पुतळा हटवण्यात आला अशी माहिती आहे.महात्मा गांधींचे अफ्रिकेतील समुदायांबद्दलचे विचार हे अफ्रिका खंडाचा अपमान करणारे होते त्यामुळे त्यांची प्रतिमा कुठेही लावली जाऊ नये असे आंदोलकांनी म्हणणे होते. त्यामुळेच या ठिकाणी असलेला पुतळा हटवण्यात यावा अशी मागणी करण्यात येत होती.

महात्मा गांधींना जगभरात अहिंचेसे प्रतीक मानलं जातं. महात्मा गांधीचे अनुयायी जगभरात आहेत. अशात अफ्रिकेतील घाना या देशाने मात्र गांधीजींना वर्णभेदी ठरवले. हा पुतळा भारत सरकारतर्फे बसवण्यात आला होता.

2016 मध्ये या पुतळ्याचे अनावरण माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी केले होते. मात्र या पुतळ्यावरून सतत होणाऱ्या आंदोलनांमुळे आता हा पुतळा हटवण्यात आला आहे.

 

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *