Sun. Sep 22nd, 2019

गांधींचे कॉंग्रेस विसर्जित करण्याचे स्वप्न नातू पूर्ण करतील – शिवराजसिंग चव्हाण

0Shares

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर कॉंग्रेस पक्षात गळती लागली आहे. कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी राजीनामे दिले असून सध्या गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या आमदारांचा आणि खासदारांचा पक्षावर विश्वास उरला नसल्याचे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण यांनी म्हटलं आहे. शिवराजसिंग चव्हाण गुरुवारी नागपूरच्या दौऱ्यावर आले असताना वक्तव्य केल्याचे समजते आहे.

काय म्हणाले शिवराजसिंग चव्हाण ?

कॉंग्रेस पक्षामध्ये गळती लागली असून सध्या गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

आमदार आणि खासदारांचा पक्षावर विश्वास उरला नसल्याची टीका मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण यांनी म्हटलं आहे.

भाजपचे सदस्यता नोंदणी अभियान सुरू असल्यामुळे शिवराजसिंग नागपूर दौऱ्यावर आले होते.

यावेळी शिवराजसिंग चव्हणा यांनी ही घणाघाती टीका केल्याचे समजते आहे.

कर्नाटकसह गोव्यामध्येही कॉंग्रेसचे नेते राजीनामा देत आहेत.

त्यासंदर्भातच कर्नाटक मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी तात्काळ राजीनामा द्यावा असे शिवराजसिंग चव्हाण यांनी म्हटलं आहे.

त्याचबरोबर त्यांचा नैतिक अधिकार राहिला नसल्याचेही शिवराजसिंग यांनी म्हटलं आहे.

महात्मा गांधी यांचे कॉंग्रेस विसर्जित करण्याचे स्वप्न नातू पूर्ण करतील अशी स्थिती कॉंग्रेसमध्ये निर्माण झाली आहे.

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *