चाळीत मोठ्या झालेल्या मंत्र्याला गृहनिर्माण खातं

महाआघाडी सरकारचं बहुप्रतिक्षित खातेवाटप करण्यात आलं.
चाळीत मोठे झालेल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्याला गृहनिर्माण खातं देण्यात आलं आहे. कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाडांची गृहनिर्माण खातं मिळालं आहे.
जितेंद्र आव्हाडांनी एक ट्विट करत शरद पवारांचे आभार मानले आहेत. ही किमया फक्त शरद पवार साहेबच करु शकतात, असे आव्हाडा या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाडांनी आपल्या लहानपणी ज्या चाळीत राहिले, त्या ठिकाणाचं पत्ता शेअर केला आहे.
लहानपणीचा घरचा पत्ता –
चाळीचे नाव श्रीपत भवन,
खोली क्रमांक ६,
वाडिया स्ट्रीट,
ताडदेव.
मुंबई.
जितेंद्र आव्हाड हे कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या दिपाली सय्यद यांचा ७५ हजार ६३९ इतक्या मताधिक्याने पराभव केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसला 12 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रीपद मिळाली आहेत. एकनाथ शिंदेंकडे असलेले गृहमंत्री खातं राष्ट्रवादीला मिळालं आहे. राष्ट्रवादीच्या अमित देशमुख यांना गृहमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली आहे.
मलाईदार आणि महत्वाची खाती राष्ट्रवादीला देण्यात आली आहेत.