Mon. Aug 8th, 2022

बहुप्रतिक्षित शिवभोजन योजनेचं विविध जिल्ह्यात शुभारंभ

देशासह राज्यभरात मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील गर्दीच्या ठिकाणी शिवभोजन योजनेचा शुभारंभ करण्यात आलं आहे.

महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी पालकमंत्री या नात्याने आप आपल्या जिल्ह्यात शिवभोजन योजनचं शुभारंभ केलं आहे. या  योजनेच्या शुभारंभाचे फोटो अनेक पालकमंत्र्यांनी ट्विट केलं आहे.

पहिल्या टप्प्यात एकूण 50 ठिकाणी ही योजना सुरु केली जाणार आहे. शिवभोजन केंद्र दुपारी 12 ते 2 या कालावधीत सुरु असणार आहेत.

या योजनेसाठी राज्य सरकारच्या वतीने  6 कोटी 48 लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.

मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण 17 ठिकाणी शिवभोजन योजनेचा लाभ घेता येणार आहे.

शिवभोजन योजनेनुसार मुंबईच्या वाट्याला  450 तर मुंबई उपनगरच्या वाट्याला सर्वाधिक 1500 थाळ्या आल्या आहेत.

तर सिंधुदुर्ग आणि गडचिरोलीच्या वाट्याला सर्वात कमी म्हणजेच 150 थाळ्या मिळाल्या आहेत.  

महाराष्ट्रात शिवभोजन योजनेची सुरुवात ही पहिल्या 3 महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर करण्यात आली आहे.

शिवसेनेने विधानसभा निवडणुकीच्या वेळेस 10 रुपयात शिवभोजन योजना सुरु करणार असल्याची घोषणा केली होती.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज महसूल कर्मचारी उपहारगृह येथे शिवभोजन योजनेचा शुभारंभ केला. याबाबतचे ट्विट आदित्य ठाकरेंनी केलं आहे.

पोटाला जात, धर्म तसेच आर्थिक परिस्थितीचं निकष न लावता सर्वांना स्वस्त आणि सकस आहार जनतेला मिळावा, हेच या योजनेचं उद्दिष्ट असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबई शहरचे पालकमंत्री आणि मंत्री अस्लम शेख यांनी नायर हॉस्पीटलमध्ये शिवभोजन योजनेचं शुभारंभ केला.

अस्लम शेख यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांनी शिवभोजन योजनेचं शुभारंभ केला आहे.

पुणे

पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी 11 वाजता पुणे महानगरपालिकेच्या उपाहारगृहात शिवभोजन योजनचं उद्घाटन केलं.

पुण्यात एकूण 11 ठिकाणी शिवभोजन केंद्र असणार आहेत. यामध्ये पुण्यात 7 तर पिंपरी चिंचवडमध्ये 4 केंद्र असणार आहेत.

नाशिक

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशकात शिवभोजन योजनेचं उद्घाटन करण्यात आलं. ही योजना सरकारची महत्वकांक्षी योजना असल्याचे भुजबळ म्हणाले.

नाशकात एकूण 4 ठिकाणी शिवभोजन केंद्र असणार आहेत.

अलिबाग, रायगड

अलिबाग येथे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते या योजनेचं शुभारंभ केला गेला.

पुरोगामी महाराष्ट्रात कोणीही उपाशी राहू नये यासाठी ही योजना आणली आहे, असे आदिती तटकरे म्हणाल्या.

राजेश टोपे यांनीही या योजनेचं शुभारंभ केला. या योजनेचा गोरगरिब जनतेला फायदा होणार आहे, अशा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

तसेच मंत्री के.सी.पाडवी, गुलाबराव पाटील, यांच्यासह अनेक मंत्र्यांनी शिवभोजन योजनेचं शुभारंभ करतानाचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.

दरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यात शिवभोजन योजनेला भरभरुन प्रतिसाद मिळाला.

त्यामुळे या योजनेला भविष्यात चांगला प्रतिसाद मिळेल, असा आशावाद अनेकांकडून व्यक्त केला जात आहे.  

अशी आहे शिवभोजन थाळी

30 ग्रामच्या 2 चपात्या

100 ग्रॅम भाजीची वाटी

Image

150 ग्रॅम भात

100 ग्रॅम वरण

शिवभोजन योजनेनुसार जिल्ह्याला मिळणाऱ्या थाळ्या

जिल्हानिहाय मिळणाऱ्या थाळ्यांची वर्गवारी
जिल्हानिहाय मिळणाऱ्या थाळ्यांची वर्गवारी

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.