Fri. Aug 12th, 2022

महाविकास आघाडीने विश्वासदर्शक ठराव जिंकला

मुंबई : विधानसभेत महाविकास आघाडीने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. विश्वासदर्शक ठरावाला आमदार जयंत पाटील, नवाब मलिक आणि सुनील प्रभू यांनी विश्वासदर्शक प्रस्तावाला अनुमोदन दिलं.

विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 169 आमदारांनी पाठींबा दिला. तर 4 आमदारांनी तटस्थाची भूमिका घेतली. एमआयमच्या 2 तर मनसे आणि सीपीएम यांच्या 1 आमदाराने तटस्थ भूमिका घेतली.

तसेच भाजपच्या सर्व आमदारांनी सभात्याग केला. या सभात्यागामुळे विरोधात एकही मत पडले नाही.

विश्वासदर्शक ठरावाला विधानसभेत दुपारी 2 वाजता सुरुवात झाली. विधानसभेचं संपूर्ण कामकाज हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी पाहिलं.   

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.