Wed. Oct 27th, 2021

महाविकासआघाडीच्या बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार सोमवारी

महाविकास आघाडीच्या बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त सापडला आहे. सोमवारी म्हणजेच 30 डिसेंबरला शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे.

हा कार्यक्रम विधानभवनाच्या प्रांगणात पार पडणार आहे. या शपथविधीसाठी विधानसभेच्या प्रांगणात जोरदार तयारी सुरु आहे. या शपथविधीसाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था असणार आहे.

हा जम्बो मंत्रिमंडळ विस्तार असणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षाचे नेते शपथ घेतील.

यामंत्रिमडळ विस्तारात 36 जण मंत्रीपदाची शपथ घेतील अशी माहिती मिळत आहे.

दरम्यान महाविकासाघाडीचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार 28 नोव्हेंबरला शिवतिर्थावर पार पडला होता.

यामध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि डॉ.नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती.

तर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांनी शपथ घेतली होती.

राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *