Sat. Jul 11th, 2020

महाविकासआघाडीचं बहुप्रतिक्षित खातेवाटप जाहीर

महाविकासआघाडीचा बहुप्रतिक्षीत खातेवाटर जाहीर करण्यात आलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या 36 आमदारांनी गेल्या सोमवारी मंत्रिपदाची शपथ घेतली होती.

एकनाथ शिंदेंकडे असलेले गृहमंत्रीपद राष्ट्रवादीच्या अनिल देशमुख यांना देण्यात आलं आहे.

सर्वाधिक कॅबिनेट खाती राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली आहेत. राष्ट्रवादीला 12 कॅबीनेट तर 4 राज्यमंत्रीपद मिळाली आहेत. राष्ट्रवादीला मलाईदार आणि महत्वाची खाती मिळाली आहेत.

असं आहे महाविकासआघाडीचं खातेवाटप

शिवसेना कॅबिनेट आणि राज्यमंत्री

शिवसेनेला एकूण 10 कॅबिनेट तर 4 राज्यमंत्रीपदं मिळाली आहेत.

सुभाष देसाई – उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा

एकनाथ शिंदे – नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)

संजय राठोड – वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन

गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा व स्वच्छता

दादा भुसे – कृषि, माजी सैनिक कल्याण

संदीपान भुमरे – रोजगार हमी, फलोत्पादन

अनिल परब – परिवहन, संसदीय कार्य

उदय सामंत – उच्च व तंत्र शिक्षण

आदित्य ठाकरे – पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार

शंकरराव गडाख (क्रांतिकारी पक्ष) – मृदा व जलसंधारण

शिवसेना राज्यमंत्री

अब्दुल सत्तार – महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य

शंभूराज देसाई – गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन

बच्चू कडू (प्रहार जनशक्ती) – जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार

राजेंद्र येड्रावकर – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे कॅबिनेट मंत्री

अजित पवार (उपमुख्यमंत्री) – वित्त, नियोजन

जयंत पाटील – जलसंपदा व लाभक्षेत्र विकास

छगन भुजबळ – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

दिलीप वळसे पाटील – कामगार, राज्य उत्पादन शुल्क

धनंजय मुंडे – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य

अनिल देशमुख – गृह

हसन मुश्रीफ – ग्राम विकास

राजेंद्र शिंगणे – अन्न व औषध प्रशासन

नवाब मलिक – अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता

राजेश टोपे – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

जितेंद्र आव्हाड – गृहनिर्माण

बाळासाहेब पाटील – सहकार, पणन

राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यमंत्री

दत्तात्रय भरणे – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन

आदिती तटकरे – उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क

संजय बनसोडे – पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य

प्राजक्त तनपुरे – नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन

काँग्रेसचे कॅबिनेट आणि राज्यमंत्री

बाळासाहेब थोरात – महसूल

नितीन राऊत – उर्जा

अशोक चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)

के सी पाडवी – आदिवासी विकास

विजय वडेट्टीवार – इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भुकंप पुनर्वसन

अमित देशमुख – वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य

सुनिल केदार – पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण

यशोमती ठाकूर – महिला व बालविकास

वर्षा गायकवाड – शालेय शिक्षण

अस्लम शेख – वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास

काँग्रेस राज्यमंत्री

सतेज पाटील – गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण

डॉ. विश्वजीत कदम – सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा

महाविकासआघाडीचं एकूण 43 मंत्र्यांच सरकार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *