Sun. Jun 13th, 2021

महाविकासआघाडीचं खातेवाटप जाहीर

मुंबई : महाविकासआघाडीचं बहुप्रतिक्षीत खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, जयंत पाटील, नितीन राऊत आणि बाळासाहेब थोरात या नेत्यांना मंत्रिपद जाहीर करण्यात आलं आहे. महत्वाची खाती शिवसेनेला मिळाली आहेत.

महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या गृहमंत्रिपदाची जबाबदारी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना देण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंच्या रुपात महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री मिळाला आहे.

तसेच गृहमंत्रिपदासोबतच महत्वाची खाती शिवसेनेने आपल्याकडे ठेवली आहेत.

असे आहे खातेवाटप

सुभाष देसाई : उद्योग आणि खनिकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषि, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्ये, राजशिष्टाचार, भूकंप पुनर्वसन, बंदरे आणि खारभूमी विकास

एकनाथ शिंदे : गृह, नगर विकास, वने, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृदा व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण.

छगन भुजबळ : ग्रामविकास, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन.

जयंत पाटील : वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, कामगार, अल्पसंख्याक विकास.

बाळासाहेब थोरात : महसूल, ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय.

डॉ. नितीन राऊत : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास, महिला व बाल विकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण.

जी खातीवाटप करण्यात आली नाही, त्या खात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडेच असणार आहेत. 28 नोव्हेंबरला शिवतिर्थावर महाविकास आघाडीच्या 6 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. परंतु खातेवाटप करण्यात आली नव्हती.

दरम्यान 16 ते 21 डिसेंबरपर्यंत नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *