Tue. Sep 27th, 2022

‘ओबीसी आरक्षणाबाबत महाविकास आघाडी अपयशी’ – पंकजा मुंडे

‘आरक्षणाशिवाय निवडणूक हा ओबीसींवर अन्याय’ – पंकजा मुंडे

   मुंबईतील भाजप पक्षाच्या मुख्यालयात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीका केली आहे. पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षण, एसटी आंदोलनाच्या मुद्द्यावर भाष्य करत राज्य सरकारवर आरोप केले आहेत. ओबीसी आरक्षणाबाबतीत महाविकास आघाडी अपयशी ठरले असल्याचा आरोप पंकजा मुंडे यांनी केला आहे.

  ‘राज्य सरकारने जनतेचे हित जोपासत निर्णय घेणे गरजेचे होते. मात्र सरकारने असा कुठलाही निर्णय घेतला नाही. ओबीसीचे आरक्षण रद्द होण्याचा निर्णय या सरकारच्या काळात झाला. ओबीसीच्या आरक्षणाबाबत सरकारने योग्य निर्णय घेतला असता तर आज ओबीसीचे आरक्षण वाचले असते, असे पंकजा मुंडे म्हटले आहेत.

  शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गप्प आहेत. राज्यात पूरग्रस्त परिस्थिती उद्भवली होती. या परिस्थिती शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र राज्य सरकारकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मोजकीच मदत करण्यात आली असल्याचे पंकजा मुंडे म्हटल्या आहेत. तसेच प्रत्येक वेळी केंद्र सरकारकडे बोट दाखवू नेय असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

  महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. एसटी कर्मचाऱ्यांनी विलिनीकरण्याच्या मागणीसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मात्र अद्याप कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर ठोस निर्णय घेण्यात आला नाही. मविआ सरकारमध्ये असमन्वय असून राज्य सरकारच्या विलंबामुळेच एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.