‘महाविकास आघाडीचे सरकार सध्या पडणार नाही’ – राज ठाकरे

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सध्या पडणार नाही, असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी औरंगाबाद दौऱ्या दरम्यान केले आहे.
सोमवारी नाशिकचा दौरा आटपून राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांना ठाकरे सरकार पडेल असे वाटते का? असे विचारल्यानंतर ते म्हणाले, ‘महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखालचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. हे सरकार सध्या पडणार नाही’, असे रोखठोक वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.
राज्यातील विरोधी पक्षनेते महाविकास आघाडी सरकार लवकरच पडेल असे दावे करत असतात. मात्र राज ठाकरे यांनी विरोधकांच्या प्रत्युत्तर दिले आहे. तसेच ओबीसी आरक्षणाबाबतही राज ठाकरे म्हणाले आहेत. ओबीसी राजकीय आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणामुळे राजकारणात उधाण आले आहे. आमच्याकडे मत मागण्यास येऊ नका अशी भूमिका ओबीसी समाज घेत आहे. त्यामुळे ओबीसी समाजाला सामोरे जाण्याची त्यांची हिंमत नाही, त्यामुळे या पार्श्वभूमीवर निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता आहे, असेही राज ठाकरे म्हटले आहेत.
I was planning on starting the guide with wordpress..