Wed. Jan 19th, 2022

‘मविआ सरकारने महापुरुषांच्या विचारांचे प्रकाशन थांबवले’ – देवेंद्र फडणवीस

महाविकास आघाडी सरकारने महापुरषांच्या विचारांचे प्रकाशन थांबवले असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केला आहे. ते म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांसारख्या युगपुरुषांचे साहित्य प्रकाशन राज्य सरकारने बंद केल्यामुळे न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले. म्हणून राज्य सरकार यावर तकलादू कारण देत आहे. त्यामुळे राज्यसरकारने पुन्हा महापुरुषांचे खंड प्रकाशन सुरू करावेत,’ अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रकाशन पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, जगातील सर्वोत्कृष्ठ संविधान ज्यांनी भारताला दिले, त्या भारतरत्न डा. बाबसाहेब आंबेडकर यांचे साहित्य प्रकाशन कार्याची दुरावस्था होत आहे. त्यामुळे तुम्ही या कामात लक्षे देऊन संबंधितांना निर्देश देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

ग्रंथांना मोठ्या प्रमाणात मागणी असताना ग्रंथच उपलब्ध नसणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारनेच महापुरुषांच्या विचारांचे प्रकाशन थांबवले असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर  केला आहे. म्हणून राज्य सरकारने यावर लक्ष घालून आंबेडकरांसारख्या महान पुरुषांच्या विचारांचे प्रकाशन पुन्हा सुरू करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *