Sat. May 25th, 2019

अजब! एकाकी महिलेला चक्क 19,930 रुपयांचे वीज बिल

0Shares

 

अनेकदा वीज वितरणाकरून जास्त बिल आल्याचे किस्से आपण ऐकले आहेत. पण मुंबईतील दिवा मध्ये महावितरणाचा अजब कारभार समोर आला आहे. महावितरणाकडून चक्क दिवातील एका घरात महावितरणाकडून चक्क 19930 रुपयांचे वीज बिल आलं आहे. विशेष म्हणजे घरात एकच वृद्ध महिला राहते आणि एवढे बिल बघून त्या महिलेला चांगलाचं धक्का बसला आहे. आणि या महिलेच्या घरी इतकं बिल आल्यामुळे त्या परिसरात महावितरणाची खिल्ली उडवली जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

दिव्यात गणेश नगर चाळीत आईमल्ली चेटीयार या वृद्ध महिला राहतात.

या महिलेली महावितरणाकडून चक्क 19,930 रुपयांचे वीज बिल आलं आहे.

असं अव्वाच्या सव्वा बिल बघून हि महिला थक्क झाली आणि महावितरणाचे कार्यालय गाठले.

त्यांनी वारंवार महावितरणाचे कार्यालय गाठत मिटर बदल्याची मागणी केली आहे.

तसेच काही रक्कमेची पूर्तता देखील या महिलेने केले मात्र बिल कमी होत नसल्याचे त्यांनी सांगितले.

त्याच बरोबर दिवामध्ये वारंवार लाईट जात असल्याने एवढं बिल कसं आलं हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

व्यवस्थित मीटर रिडींग न घेता अशी बिल पाठवून नागरिकांची दिशा भूल करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *