Wed. Jun 26th, 2019

‘गडबडे बाबां’ची गडबड लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

41Shares

दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर लवकरच वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘भाई’ सिनेमाचं दिग्दर्शन केल्यानंतर पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या सिनेमात महेश मांजरेकर एका आध्यात्मिक गुरूच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘गडबडे बाबा’ असं त्य़ांच्या character चं नाव आहे. या character चा look एका प्रसिद्ध आध्यात्मिक गुरूवरून प्रेरित असल्याचं दिसून येतंय.

मनोरंजनाने भरलेल्या या सिनेमाचा Trailer नुकताच प्रदर्शीत झाला आहे. तर हा सिनेमा 1 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

‘सर्व लाईन व्यस्त आहेत’

अमोल उत्तेकर प्रस्तुत, स्टेलारीया स्टुडीयो निर्मित आणि प्रदिप रघुनाथ मेस्त्री दिग्दर्शित हा सिनेमा आहे.

सिनेमात मांजरेकर हे कूल साधू ‘गडबडे बाबा’ची भुमिका निभावणार आहेत.

गडबडे बाबा भाविकांच्या मनातील प्रश्नांचे हटके पद्धतीने निरसन करणारे आहे.

सिनेमातील अफलातून डायलॉग धुमाकूळ घालणार असल्याचा अंदाज Trailerमधून होत आहेच.

प्रेम-लग्न यांविषयी गडबडे बाबांचे विचार आणि अचूक भाकीत खूप मनोरंजक ठरणार आहे.

या सिनेमात सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, संस्कृती बालगुडे आदी कलाकारंची फौज आहे.

41Shares

Leave a Reply

%d bloggers like this: