Tue. Sep 28th, 2021

सुटकेसमध्ये आढळले मानवी शरीराचे तुकडे

मुंबई :  माहिम येथे सुटकेसमध्ये मृतदेह सापडला असून मृतदेहाचे तुकडे करून सुटकेसमध्ये भरले असल्याचं समोर आलं आहे.

सोमवारी संध्याकाळची ही घटना असून सुटकेसमध्ये पुरुषाचा मृतदेह असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

माहिम दर्ग्याच्या पाठीमागे काही तरूणांना समुद्र किनारी एक सुटकेस पडलेली सापडली. सुटकेस जड लागल्याने त्यांनी खोलून पाहिले असता त्यामध्ये तुटलेले हात आणि पाय आढळले. याबाबत माहीती मिळताच माहिम पोलिस घटनास्थळी पोहचले आणि सुटकेस ताब्यात घेतली.

शिर आणि धड काहीच नसल्याने हे हात आणि पाय कुणाचे आहेत हे सांगता येत नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. हे तुकडे वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर माध्यमातून सुटकेस टाकणाऱ्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *