Mon. Oct 25th, 2021

#MainBhiChowkidar: पंतप्रधान नरेंद्र मोदींची निवडणूक अभियानाला सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी #MainBhiChowkidar या हॅशटॅगसह एक व्हिडिओ टि्वट करत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार मोहिम सुरु केली आहे.

या व्हिडिओत एक गाणे असून त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जनसभामध्ये लोकांसोबत, रणगाडयामध्ये दिसतात.

या गाण्यामध्ये प्रामुख्याने लोक सुद्धा ‘में भी चौकीदार हूँ’ बोलताना दिसतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्याच आशयाचे टि्वट केले आहे. तुमचा चौकीदार ठाम असून देशाची सेवा बजावत आहे.

पण मी एकटा नसून जे कोणी भ्रष्टाचार, समाजातील वाईट गोष्टींविरोधात लढा देत आहेत ते सुद्धा चौकीदार आहेत.

जे कोणी देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मेहनत घेत आहेत ते सुद्धा चौकीदार आहेत.

आज प्रत्येक भारतीय #MainBhiChowkidar म्हणत आहे असे पंतप्रधान मोदी त्यांच्या टि्वटमध्ये म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *