पोलीस स्टेशनमध्येच घुसून महिलेवर गोळ्या झाडल्या
वृत्तसंस्थ, नवी दिल्ली
उत्तर प्रदेशमध्ये सरकार बदललं पण कायदा तुडवणं मात्र सुरुच असल्याची धक्कादायक बाब पुन्हा समोर आली आहे.
यूपीच्या मैनपुरीमध्ये चक्क पोलीस स्टेशनमध्येच घुसून एका महिलेवर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत.
जमिनीच्या वादातून घडलेल्या या घटनेत महिलेला हॉस्पिटलमध्येसुद्धा दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
दरम्यान महिलेवर गोळ्या झाडणाऱ्यापैकी एकजण जमावाच्या तावडीत सापडला आणि जमावाने लाथा-बुक्कया, काठ्यांनी त्याला अक्षरश: तुडवतं अर्धमेलं केले.
हा प्रकार सुरू असताना पोलीस मात्र बघ्याच्या भूमिकेत पाहायला मिळाले.