मेजरने ऑनलाईन मोबाईल विकला आणि…

आताचे जग हे आधुनिक आहे. त्यामुळे सर्व व्यवहारही ऑनलाईन स्वरूपात होतात. मात्र अनेक वेळा हे व्यवहार आपल्याला तोट्यात आणतात. असे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. दरम्यान नुकताच ऑएलएक्स या ऑनलाईन खरेदी-विक्रीच्या अँपवरून पिंपरीमध्ये एका मेजरची फसवणूक करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

मेजर दौलत बोरकर असे या लष्करी जवानाचे नाव असून त्यांनी मोबाईल विक्री संदर्भात ओएलएक्सवर(OLX) जाहीरात दिली होती.

हि जाहिरात पाहून सहारूना ऐसुब आणि मोकम निरनसिंग आदिवासी या दोन व्यक्तींनी त्यांच्याशी संदर्भ साधला. आम्हाला तुमचा मोबाईल घ्यायचा आहे. आम्ही तुम्हाला ऑनलाईन पैसे पाठवतो. असे दौलत बोरकर यांना सांगण्यात आले.

मेजर बोरकर यांना खरेदीदार मिळाल्याने त्यांना यासाठी होकार दिला. यानंतर त्या दोन व्यक्तींनी मेजर बोरकरांना एक क्यु आर कोड स्कॅन करण्यास सांगितले.

त्याप्रमाणे बोरकारांनी कोड स्कॅन केला. कोड स्कॅन केल्यानंतर आरोपींनी बोरकर यांच्या खात्यातून 19 हजार 508 रूपये काढून त्यांची फसवणूक केली.

यानंतर बोरकरांनी सांगवी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत घटनेची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांना आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याचा अधिक तपास सांगवी पोलीस करत आहेत.  

यातील सहारूना ऐसुब हा राजस्थानचा रहिवासी आहे. तर मोकम निरनसिंग आदिवासी हा मध्यप्रदेशचा रहिवासी आहे. अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

Exit mobile version