Sun. Jun 20th, 2021

गणेश नाईकांना कोरोनाचा ब्रँड अँबेसिडर करावं- जितेंद्र आव्हाड

नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता जरी लागली नसली तरी राजकीय धुळवडीला सुरूवात झालीय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक मेळाव्यात राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईकांवर सडकून टीका केली. यावेळी आव्हाड यांनी गणेश नाईकांना कोरोनाचा ब्रँड अँबेसिडर करावे अशी टीका केली.

नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे युवक मेळाव्याचे आयोजन करून रणशिंग फुंकलंय. या मेळाव्यास आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत भव्य बाईक रॅली देखील काढण्यात आली. या रॅलीनंतर आयोजित युवक मेळाव्यात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भाषणात गणेश नाईक हे रेती व उद्योगधंद्यांमधील खंडणी वसूल करणारे असून त्यांनी स्वतःला मोठं केलं परंतु दुसरा कोणालाही मोठा होऊ दिले नाही असा आरोप केला.

नवी मुंबईतील राजकारणामध्ये आमदार मंदा म्हात्रे व विजय चौगुले यांनी गणेश नाईकांमुळेच राष्ट्रवादी सोडली. एवढंच नाही तर गणेश नाईक ह्यांनी आपल्या मुलाच्या तिकिटावर स्वतः उभं राहून त्याचा राजकीय बळी घेतल्याची खोचक टीका देखील आव्हाडांनी केलेय.

तर या महापालिका निवडणुकीआधी भाजपवासी झालेले दिघातील 3 नगरसेवक येत्या 12 तारखेला शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील असा खुलासा केला. तसेच राष्ट्रवादी सोडून भाजपवासी झालेल्या इतर ही अनेक नगरसेवकांनी परत यावं असं आवाहन देखील या मेळाव्यात जितेंद्र आव्हाड यांनी केलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *