Thu. Jan 27th, 2022

पूरग्रस्तांना मदत करण्यापूर्वी करा खातरजमा

राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आलेल्या पुरामुळे अतोनात नुकसान झाले. या पुरादरम्यान १०० हून अधिक मृत्यू झाले. लोकांची घरे वाहून गेली, संसार उध्वस्त झाला तसेच सार्वजनिक मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आता पूरग्रस्त भागाकडे मदतीचा ओघ सुरु असून लोक जमेल तशी मदत करत आहेत. मात्र सध्या पूरग्रस्तांच्या नावाखाली मदत मागून पैसे हडप करणाऱ्या बोगस कंपन्यांचा सुळसुळाट वाढला असून त्यांच्यापासून सावध राहण्याचा इशारा महाराष्ट्र पोलिसांनी दिला आहे. फसवणूक करणारे लोक बनावट संस्था तयार करून पूरग्रस्तांना मदत करण्याच्या नावाखाली ऑनलाईन देणग्या गोळा करीत आहेत.

महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर शाखेने नागरिकांना मदत देण्यापूर्वी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.पूरग्रस्तांच्या नावे हे सायबर चोर तुटपुंज्या रकमेची मागणी करतात. त्यासाठी बँक खात्याचे तपशील मागतात. पूरग्रस्तांसाठी भावूक होत अनेकदा नागरिक त्यांना तपशील देऊन टाकतात किंवा फोनवरून आणि समाजमाध्यमांतून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पैशांची मागणी करतात. त्यासाठी ते एखादा बँक खाते क्रमांकही देतात. नागरिक ती पोस्ट वाचून काही पैसे खात्यांत जमा करतात. मात्र ही मदत प्रत्यक्ष पूरग्रस्तांपर्यंत पोहोचत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *