Fri. May 29th, 2020

अविस्मरणीय व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यासाठी करा ‘या’ स्पेशल 10 गोष्टी…  

14 फेब्रुवारी हा दिवस संपुर्ण जगभरात प्रेमाचा दिवस म्हणजेच ‘Valentines Day’ म्हणुन साजरा केला जातो.

या दिवशी साधारण प्रेमी युगुल सिनेमा पाहायला जातात, डिनर किंवा रोमॅंटिक डेटचा प्लॅन करतात, एकमेकांना भेटवस्तू देतात.

पण तुम्हाला यापेक्षा जर हटके आणि अविस्मरणीय असा Valentines Day  साजरा करायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

या 10 स्पेशल गोष्टी ज्यामुळे तुमचा यावर्षीचा ‘Valentines Day’ नक्कीच स्पेशल आणि अविस्मरणीय ठरेल.

असा साजरा करा तुमचा अविस्मरणीय ‘Valentines Day’ 

14 फेब्रुवारीला आपल्या व्हॅलेंटाईन सोबत एका लाँगड्राइवर जा, निसर्गाच्या सानीध्यात आपल्या प्रियव्यक्ती सोबत सुंदर आठवणी बनवा.

पहिला व्हॅलेंटाईन्सडे साजरा करण्यासाठी मुंबई पासुन जवळ असलेले माथेरान,अलीबाग, लोणवळा हे उत्तम लाँगड्राइव पर्याय आहेत.

ही ठिकाणं तुमचा पहिला व्हॅलेंटाईन्सडे नक्की संस्मरणीय करतील.

अशा सुंदर ठिकाणी एकमेकांच्या सहकार्याने जर काही मस्त चमचमीत जेवण बनवल तर नक्कीच ते संस्मरणीय होइल.

तो पदार्थ आयुष्यभरासाठी आठवणीत राहील हे नक्की.

जर तुम्हाला तुमच्या प्रेमाची आठवण कायम तुमच्या सोबत असावी असे वाटत असेल आणि तुम्हाला टॅटु काढायला आवडत असेल तर दोघांनीही आपापल्या हातावर एकसारखा टॅटु काढूण Valentines Day स्पेशल करता येईल.

आजकाल ज्याप्रमाणे वाढदिवस गरीब आणि अनाथ मुलांसोबत साजरा केला जातो त्याचप्रमाणे तुमचा Valentines Day चा दिवस या मुलांसोबत साजरा केलात तर यापेक्षा सुंदर काही असुच शकत नाही.

एकमेकांना काही प्रॉमीसेस करून, काही अतापर्यंत सांगितल्या नाही अशा गोष्टी शेअर करून हा दिवस स्पेशल करता येऊ शकतो.

आजच्या तरूणाईला आकर्षीत करणाऱ्या पब, डिस्को अशा ठिकाणी Valentines Day च्या दिवशी अनेक ऑफर्स असतात.

तेव्हा या ठिकाणी जाउन तुम्ही तुमची Valentine नाइट मजेदार बनवु शकता.

मित्र-मैत्रीणींच्या सहभागा शिवाय कोणतीही पार्टी मजेदार होत नाही, तेंव्हा आपल्या मित्रांसोबत पार्टीची तयारी करा.

कोणतेही सेलिब्रेशन केक शिवाय अर्धवट वाटते, तेंव्हा आपल्या Valentines साठी आपल्या हाताने बनवलेला केक भरवण्याची मजा काही वेगळीच असेल.

तुम्ही जर लवकरच लग्न करणार असाल, तर कोणताही मुहुर्त न बघता या दिवशी तुम्ही विवाहबंधनात अडकलात तर नक्कीच हा दिवस तुमच्या प्रेमाचं रूपांतर एका सुंदर अशा नात्यात करण्याचा सुरेख दिवस ठरेल. कारण तुम्ही आयुष्यभरासाठी एकमेकांचे व्हॅलेंटाईन व्हाल.

तर अशा काही स्पेशल क्षणांनी तुमचा या वर्षीचा Valentines Day बनवा अविस्मरणीय…

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *