Jaimaharashtra news

‘चिकन 65’ बनवून लोकांना फुकटात वाटलं

कोरना विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचे भारतासह महाराष्ट्रातही रुग्ण सापडले आहेत. या कोरोना विषाणूचे पोल्ट्री व्यावसायावर मोठा गंभीर परिणाम झाला आहे.

अनेक पोल्ट्री व्यावसायिकांचे लाखो ते करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. चिकन खालल्याने कोरोना होतो, अशी अफवा समाजमाध्यमांवर पसरवली जात आहे. या अफवेमुळे लोकांनी चिकनकडे पाठ फिरवली आहे.

किरकोळ दरात चिकन विकूनही लोकं चिकन खरेदी करत नाही आहेत.

बीडमधील चिकन व्यावसायिकांनाही याचा आर्थिक फटका बसला आहे. बीडमधील या व्यावसायिकांनी एकत्र येत चिकन ६५ या पदार्थाचं वाटप केलं.

या वाटपासह या व्यावसायिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिलं आहे.

काय आहे निवेदनात ?

चिकन खाल्ल्याने कोरोना होतो, अशी अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करा, असं निवेदन या व्यावसायिकांकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे. तसेच नुकसान भरपाई देखील मिळावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

या अफवा अशाच पसरत राहिल्या तर व्यवसाय तोट्यात येईल. तसेच पुन्हा व्यवसाय उभं करणं शक्य होणार नाही असं मत या व्यावसायिकांनी व्यक्त केलं आहे.

Exit mobile version