मलेरिया आजाराविषयी असलेल्या चूकीच्या समजूती दूर करा आणि प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करा

मलेरिया सारख्या आजाराबाबत असलेल्या चुकीच्या समजूती दूर करून या आजाराचे गांभीर्य जाणून घेत त्यानुसार खबरदारी घेणे गरजेचे आहे. जागतिक मलेरिया दिनाच्या निमित्ताने या आजाराविषयी असलेल्या चूकीच्या समजूती दूर करून या आजाराबद्दल पुरेशी माहिती देण्याचा प्रयत्न या लेखाच्या माध्यमातून केला जाणार आहे. हा आजार अॅनोफेलस जातीच्या डासाच्या मादीमुळे होतो. साचलेल्या पाण्याच्या डबक्यात या डासांची पैदास होते. ताप, अंगदुखी, थंडी वाजणे आणि घाम येणे ही या आजाराची सर्वसाधारण लक्षणे आहेत. मलेरिया संबंधी असलेल्या गैरसमजूती कोणत्या? बर्याच लोकांना असे वाटते की वातानुकूलित खोलीत राहिल्यास डास चावण्याचा धोका कमी होईल आणि यामुळे मलेरिया होउ शकणार नाही. मात्र हा गैरसमज असून वातानुकूलित खोलीतही आपल्याला सावधगिरी ही बाळगावीच लागेल. आपल्याला एकदा मलेरिया झाल्यास दुस-यांदा पुन्हा मलेरिया होणार नाही. आपल्याला आवश्यक ती खबरदारी ही घ्यावीच लागते. पुर्ण हाताचे कपडे घालणे आणि डासांचा नायनाट कराणे, स्च्छता राखणे आदी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. डॉ. विक्रांत शहा, यांच्यानुसार मलेरिया जीवघेणा असू शकत नाही असे वाटणे चूकीचे. जर आपल्याला मलेरियाचे योग्य वेळी निदान झाले नाही अथवा उपचारास विलंब झाल्यास हा आजार काहीवेळेस जीवघेणा देखील ठरू शकतो. हा आजार यकृत आणि लाल रक्तपेशींवर वाईट परिणाम करतो. मलेरिया आणि डेंग्यूचा ताप सारखाच आहे. मलेरिया आणि डेंग्यूची लक्षणे काहीशी सारखी असू शकतात मात्र दोन्ही आजार भिन्न आहेत. दोन्ही रोग डासांच्या चाव्यामुळे उद्भवत असले तरी त्यावरील उपचार वेगवेगळे आहेत. मलेरिया आणि डेंग्यूमध्ये फरक ओळखून त्यानुसार उपचार घेणे आवश्यक आहे. झोपेच्या आधी लसूण खाल्ल्याने डासांचा त्रास कमी होईल असा गैरसमज अनेक लोकांमध्ये दिसून येतो. मात्र प्रत्यक्षात तसे नसून अभ्यासाद्वारे हे अद्यापही सिद्ध झालेले नाही. लसूण एक सल्फर कंपाऊंड तयार करतो ज्याला अॅलिसिन म्हणतात ज्यात काही अँटी-बॅक्टेरियल, एंटी-फंगल आणि परजीवींना विरोध करतात. परंतु जेव्हा मलेरियाचा विचार केला जातो तेव्हा लसूण आणि मानवी रोगप्रतिकारक शक्तीच्या कार्यक्षमतेबद्दल कोणतेही संशोधन आजतगायत उपलब्घ नाही. कोरड्या हवामानात डासांचा नाश होतो हा देखील एक गैरसमज आहे. कोरड्या हवामानाच्या तुलनेत पावसाळयात डासांची पैदास अधिक प्रमाणात होत असली तरी उन्हाळ्यातही अशा प्रकारचे डास दिसून येतात. डास चावल्यानंतर कोणत्याही प्रकारची लक्षणे न दिसल्यास आपल्याला मलेरिया होणार नाही या भ्रमात राहणे चूकीचे आहे. डास चावल्यानंतर होणा-या प्रतिक्रिया या व्यक्तीनुसार भिन्न असू शकतात. काही लोकांना त्वचा लालसर होणे, खाज सुटणे आणि वेदना होणे अशी लक्षणे दिसून येतात. काहींना यातील कोणतीच लक्षणे दिसून येत नाही. ताप, थंडी वाजून येणे आणि डोकेदुखी यासारखी लक्षणे आढळून आल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच योग्य निदान करून निरोगी आयुष्य जगू शकता.

Exit mobile version