Wed. Jun 16th, 2021

ऑस्कर शर्यतीत मल्याळम चित्रपट एंट्री

27 चित्रपटांमधून अखेर ‘जल्लीकट्टू’या चित्रपटाची निवड…

ऑस्कर शर्यतीत मल्याळम चित्रपट एंट्री झाली आहे. 25 एप्रिल 2021 रोजी लॉस एंजेलिस येथील सोहळ्यात ‘93व्या अकादमी अवॉर्ड्स’मध्ये भारताच्या ‘जल्लीकट्टू’ या चित्रपटाने अधिकृत प्रवेश केला आहे.

नव्या वर्षात पार पडणाऱ्या 93व्या ‘ऑस्कर’ पुरस्कार सोहळ्यात मल्याळम चित्रपट ‘जल्लीकट्टू’ला (Jallikattu) नामंकन प्राप्त झाल्यावर सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या 14 सदस्यांच्या समितीने दिग्दर्शक लिजो जोस पेलिसरी यांच्या ‘जल्लीकट्टू’ या चित्रपटाची निवड केली आहे.

‘जल्लीकट्टू’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिचर फिल्म फॉरेन लँग्वेज या विभागात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. हा चित्रपट केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील पारंपारिक ‘जल्लीकट्टू’ वादग्रस्त खेळावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. या खेळाच्या नियमांनुसार बैलाला ठार मारण्यापूर्वी गर्दीत सोडले जाते. 93व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सहभागी होण्यासाठी तब्बल 27 चित्रपटांना मागे टाकत अखेर ‘जल्लीकट्टू’ची निवड झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *