Sun. Oct 24th, 2021

मोदींचा मालदीवच्या ‘निशान इजुद्दीन’ पुरस्काराने गौरव

भारताच्या पंतप्रधानपदाची  दुसऱ्यांदा धुरा सांभाळल्यानंतर मोदींचा हा पहिलाच परदेश दौरा  गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मालदीव आणि श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहेत.  त्यांना दौऱ्या दरम्यानच मालदीवच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. गेल्या महिन्यात श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट झाले. या भीषण बॉम्ब हल्यानंतर भारत कुठल्याही परिस्थीतीत  श्रीलंकेसोबत असल्याचे भारताने जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर मोदी श्रीलंकेत जाणार आहेत.

मोदींना ‘निशान इजुद्दीन’ पुरस्कार

सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतलेले नरेंद्र मोदी यांना मालदीवच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.‘निशान इजुद्दीन’ असे मालदीवच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराचे नाव आहे.याबाबत प्रसारभारतीने ट्विट करुन माहिती दिली आहे.

नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसीय मालदीव आणि श्रीलंकेच्या विशेष दौऱ्यावर आहेत. त्यांना या दौऱ्या दरम्यानच पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.या दौऱ्यात पहिले मालदीवला जाणार आहेत आणि त्यानंतर रविवारी ते श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे समजत आहे.

श्रीलंकेच्या दौऱ्या हा गेल्या महिन्यात झालेल्या भीषण दहशतवादी साखळी स्फोटांच्या पार्श्वभूमीवर भारत श्रीलंकेसोबत असल्याचे जाहीर करण्यासाठी असणार आहे.गेल्या आठवड्यात झालेल्या शपथविधीच्या कार्यक्रमाला  श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना हजर होते.‘नेबरहूड फर्स्ट’ असल्याचा दाखविण्याचा प्रयत्न मोदींचा असणार आहे.

 


मोदी आणि मालदीवचे राष्ट्रपती सोलेह हे मिळून कोस्टल सर्विलन्स रडार सिस्टिमला लॉच करणार आहेत.या रडार्समुळे हिंदी महासागरात भारतीय नौद निरीक्षणासाठी मदत मिळेल असे सांगितले जाते. मालदीव हा भारताचा एक चांगला मित्र असून या देशासोबत आपली संस्कृती आणि इतिहास खोलवर जोडला गेला आहे.

त्यामुळे गेल्या काही वर्षात मालदीवसोबत भारताचे द्विपक्षीय संबंध अधिकच मजबूत झाले आहेत. या भेटीमुळे हे नाते अधिकच घट्ट होईल असे मोदींनी या दौऱ्यावर भाष्य करताना म्हटले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *