Fri. Dec 3rd, 2021

बोकड चक्क दूध देतोय; गोंदियात ‘अजूबा’

जय महाराष्ट्र न्यूज, गोंदिया

 

गाई-म्हशी आणि शेळी दूध देतात, हे तुम्हा-आम्हाला माहित आहे. मात्र, बोकड दूध देतो, असं म्हटलं तर..? ऐकून आश्चर्य वाटतय ना..?, पण हे खर आहे.

 

गोंदियामध्ये ‘अजूबा’ नावाचा एक बोकड चक्क दूध देतोय. गोरेगाव तालुक्यातील पिपरटोला गावात ‘कटरे’ कुटुंब शेळी पालनाचा व्यवसाय करत आहेत.

 

कटरे कुटुंबाकडे सध्या 40 हून अधिक दुभत्या शेळ्या आहेत. त्यामुळे प्रजननासाठी बोकडाची गरज भासते.

 

उच्च दर्जाच्या शेळ्या उत्पादित करण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी त्यांनी ‘तोतापुरी’ प्रजातीचा बोकड खरेदी केला. ‘अजूबा’ सध्या अडीच वर्षांचा आहे.

 

इतर शेळ्यांप्रमाणे बोकडाला आंघोळ घालून उन्हात उभं केलं असता, त्याच्या स्तनातून दूध टपकताना दिसले.

 

पहिल्या दिवशी या बोकडानं चक्क 150 मिलीलीटर दूध दिले.  तेव्हा दूध देणाऱ्या या ‘अजूबा’ बोकडाविषयी पशु वैद्यकीय अधिकऱ्यांना माहिती देण्यात

आली.

 

वैद्यकीय तपासणीनंतर त्याला ‘गानोको-मोसटिया’ नावाचा आजार झाला. तसेच त्याच्या शरीरातील हार्मोन्समध्ये बदल झाल्यानं हा बोकड दूध देतोय असं सांगण्यात

आले. 

 

अश्यातच 25 हजार रुपयांना खरेदी केलेल्या या बोकडाला आज दीड लाखांपर्यंतची मागणी आहे. तर, तिथेच संशोधनासाठी पशु संवर्धन विभागाने या बोकडाला दत्तक

घेण्याचीही तयारी दर्शवली. त्यामुळे शेळी मालक सतीश कटरे यांनी ‘अजूबा’ची विक्री न करण्याचा निर्णय घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *