मालेगावात कोरोनाचे नियम झुगारून भरवली शाळा

अनावश्यक गर्दी करत कोरोना संक्रमणाला निमंत्रण देणाऱ्या मालेगावकरांचा बेजबाबदारपणा नेहमी चर्चेत राहिला आहे. आता तर कोरोनाचे निर्बंध झुगारून मालेगाव गर्ल्स अँड ज्युनियर कॉलेजचे संपूर्ण वर्ग भरून हद्दच ओलांडली.

वर्ग सुरू ठेवण्यासंदर्भात अद्याप निर्णय न झाल्याने ही वर्ग तूर्तास बंद ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र मालेगाव त्या आदेशाचे उल्लंघन करत मालेगाव गर्ल्स हायस्कुल अँड ज्युनिअर कॉलेजचे पाचवी ते बारावीपर्यंतच्या सर्व वर्ग नियमित सुरू होते. मालेगाव हायस्कूलच्या सुरू असलेल्या कॉलेजची माहिती मिळताच आझादनगर पोलीस प्रभाग अधिकाऱ्यांनी पाहणी केली आणि पाहणीत वर्गामध्ये नियमित कामकाज सुरू असल्याचे दिसून आले.

पोलीस आणि अधिकाऱ्यांची चाहूल लागल्याच विद्यार्थी आणि शिक्षकांची धावपळ झाली. शाळा सुरू ठेवून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिका अधिकाऱ्यांनी तीन हजार दंड आणि प्रांताधिकारी शर्मा यांनी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिलेत.

Exit mobile version