मलिक आणि त्यांनी केलेल्या आरोपी लोकांची नार्को टेस्ट करावी – अँड आशिष शेलार

‘मलिकांनी केलेले काही आरोप गंभीर आहेत. नवाब मलिकांकडे अजूनही माहिती असू शकते. त्यामुळे राज्य सरकारने मलिक आणि त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले आहेत त्या दोघांचीही नार्को टेस्ट करावी म्हणजे ‘दूध का दूध पानी का पानी’ झाले पाहिजे, अशी मागणी करत भाजप नेते अँड आशिष शेलार यांनी मलिकांवर टीका केली आहे.
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी समीर वानखेडेंवर अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे मलिकांना ड्रग्जविषयी इतकी माहिती होती तर त्यांनी आधीच का नाही दिली? आर्यन खानला अटक झाल्यानंतर ते का बोलू लागले? असा सवालही आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार आहेत. त्यामुळे मलिक घाबरले असून त्यांनी कानावर हात ठेवले आहेत. आज त्यांचा बदललेला चेहरा, बदललेला आवाज, बदललेला संवाद यातून स्पष्ट झाले आहे. तरिही दिवाळीनंतर बाँम्ब फोडला जाईल असे, आशिष शेलार म्हणाले. ड्रग्जच्या विरोधात कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी भाजप करत आहे. परंतु समीर वानखेडे यांच्या चारित्र्याचे प्रमाणपत्र देणे भाजपचे काम नाही. त्यामुळे विरोधकांनी विषय भरकटू नये, असेही ते म्हणाले.