Sat. Oct 1st, 2022

मलिक, देशमुख मतदान करू शकणार नाहीत

राज्यातल्या महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी मतदान होणार असून त्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी करत या दोघांनी कोर्टात अर्ज केला होता. अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोघेही कोठडीत आहेत.

राज्यसभा निवडणुकीसाठी एक एक मत महत्वाचे ठरणार आहे. याचमुळे सध्या तुरुंगात असलेले कॅबिनेट मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील मतदान करता यावं यासाठी एक दिवसाच्या जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यामुळे अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करता येणार का? याकडे लक्ष लागलं होतं. पण, मुंबई सत्र न्यायालयाने या दोन्ही नेत्यांना मतदानाची परवानगी नाकारली आहे. सत्र न्यायालयाने या दोन्ही नेत्यांचे अर्ज फेटाळून लावले आहे. त्यामुळे 10 जून रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत अनिल देशमुख आणि नवाब मलिक मतदान करू शकणार नाहीत.

एखाद्या गुन्ह्यात लोकप्रतिनिधी अटकेत असला तो संबधित यंत्रणेच्या कस्टडीत नसून न्यायालयीन कोठडीत असेल तर तो लोकप्रतिनिधी मतदान करण्याचं कर्तव्य बजावू शकतो. या पूर्वी अशा अनेक घटनांमध्ये न्यायालयाने परवानगी दिलेली आहे, असा युक्तीवाद मलिक यांचे वकील ऍड अमित देसाई यांनी युक्तिवाद केला. दरम्यान, मुंबई सत्र न्यायालयाने परवानगी नाकरल्यानंतर आता राष्ट्रवादीने उच्च न्यायलयात धाव घेतली आहे. वेळ अत्यंत कमी असल्यामुळे उच्च न्यायलयात आजच सुनावणी होते का शुक्रवारी याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. राज्यसभा निवडणुकीला अवघी एक दिवसा राहिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.