Wed. Oct 5th, 2022

मलिकांचा राजीनामा घ्यायचा नाही; शरद पवारांचे आदेश

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक केली आहे. तब्बल आठ तास चौकशीनंतर मलिकांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली.

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी विरोधकांकडून जोर धरत आहे. याबाबत शरद पवारांच्या उपस्थितीत सिल्ह्वर ओकवर वरिष्ठांची बैठक पार पडली. या बैठकीत नवाब मलिकांचा राजीनामा घ्यायचा नाही, असे आदेश शरद पवारांनी दिले आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थिती वरिष्ठांची बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे असे प्रमुख नेते उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर ईडीकडून कारवाई झाल्यानतंर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकांऊंटवरून विरोधकांवर टीका करण्यात आली. ‘भाजपमध्ये प्रवेश करून किंवा भाजपमध्ये राहून आपले घोटाळे लपले जातात, हा ओव्हर कॉन्फिडन्स अनेक भाजपच्या भ्रष्ट नेत्यांना झाला आहे. केंद्रीय यंत्रणा वापरून विरोधकांवर दबाव टाकायचे राजकारण आज सुरू आहे. तरीही जनता मात्र भाजप नेत्यांचा भ्रष्टाचार विसरलेली नाही.’, अशी टीका राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटरवरून करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.