Mon. Jul 4th, 2022

मलिकांनी उघड केले के.पी. गोसावीचे व्हॉट्सऍप चॅट

  क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावरील आरोप सुरूच आहेत. नवाब मलिक यांनी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित केपी गोसावी आणि खबरी यांच्यामधील संभाषण ट्विट केले आहे.

  क्रुझवरील आर्यन खान ड्रग्जप्रकरणी नवाब मलिकांनी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या के.पी. गोसावीचे व्हॉट्सअप चॅट ट्विट करत सादर केले आहेत. ‘क्रुझवरील ड्रग्जपार्टीत ठराविक लोकांना अडकवण्यासाठीचे प्लॅनिंग के.पी. गोसावी आणि खबरीमधील व्हॉट्सऍप चॅटमधून समोर आले आहे.’ त्यामुळे ही समीर दाऊद वानखेडे यांची प्रायव्हेट आर्मी आहे आणि याची उत्तरे त्यांना दावेच लागतील, असे नवाब मलिकांनी ट्विट करत सांगितले आहे.

  नवाब मलिकांनी के.पी. गोसावीचे व्हॉट्सऍप चॅट ट्विट केल्यामुळे मलिकांच्या या खळबळजनक गोप्यस्फोटाने या ड्रग्जप्रकरणाला नवे मिळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच गोव्यात लपलेल्या काशिफ खानला एनसीबीकडून अटक का झाली नाही? असा संतप्त सवालही मलिकांनी एनसीबीला विचारला आहे. तसेच समीर वानखेडे यांनी क्रुझवरील लोकांना अडकवण्याचा डाव रचल्याचा आरोप मलिकांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.