‘मलिक, तुम्ही अधिक जबाबदारीने वागायला हवं’ – उच्च न्यायालय

क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबावर अनेक आरोप केले आहेत. मलिकांनी केलेल्या आरोपांमुळे समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिकांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. यावर मुंबई उच्च न्यायालयाने या खटल्याचा निकाल राखीव ठेवला आहे.
मलिकांनी समाजमाध्यमांवर सादर केलेल्या कागदपत्रांविषयी न्यायालयाने मलिकांना चांगलेच फटकारले आहे. नवाब मलिकांना अधिक जबाबदारीने वागण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. समीर वानखेडे यांचा जन्मदाखला ट्वीट करण्यापूर्वी पूर्णपणे तपासला असल्याचे मलिकांनी न्यायालयाला सांगितले होते. मात्र सर्वसामान्य व्यक्तीला कदाचित तितक्या काळजीपूर्वक तपासता येणार नाही, परंतु आमदार मंत्रीने कागदपत्र अधिक काळजी घेऊन तपासणे अपेक्षित आहे अशा शब्दात उच्च न्यायालयाकडून मलिकांना फटकारले आहे.
मलिकांनी वानखेडे कुटुंबावर अनके बदनामकारक आरोप केले आहेत. त्यामुळे ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिकांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. त्यामुळे मलिकांना समाज माध्यमांवर आरोप प्रसिद्ध करण्यास मनाई करण्याचा अर्ज करण्यात आला आहे. दरम्यान, ज्ञानदेव वानखेडे यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्याचा निकाल उच्च न्यायालयाने राखीव ठेवला आहे.