मलिंगाची वेगळी वाट

श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आयपीएल सामन्यांसाठी दुसऱ्या संघाशी करारबद्ध झाला आहे. मलिंगा राजस्थान रॉयल संघासोबत करारबद्ध झाल्यामुळे मुंबई इंडियन्स संघ मलिंगावर नाराज आहे. मलिंगाची राजस्थान रॉयल्सच्या वेगवान गोलंदाजी प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. त्यामुळे आयपीएलच्या १५व्या सीजनमध्ये लसिथ मलिंगा राजस्थान रॉयल्सच्या वेगवान गोलंदाजांना प्रशिक्षण देणार आहे. लसिथ मलिगांने त्याच्या भविष्याचा विचार करून आयपीएलमध्ये राजस्थान रॉयलसोबत करारबद्ध होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मलिंगाच्या या निर्णयामुळे मुंबई इंडियन्स संघ नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.