Sun. Jun 20th, 2021

माळशेज घाट येथे पंतग महोत्सवाचे आयोजन

माळशेज घाट पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतो. पावसाळ्यात या घाटात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात.

आता माळशेज येथे पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे आयोजन एमटीडीसी ( Maharashtra Tourism Development Corporation ) च्या वतीने करण्यात आले आहे.

हे पतंग महोत्सव एकूण 3 दिवस चालणार आहे. 10 जानेवारीला या महोत्सवाला सुरुवात होणार आहे.

या पतोंगत्सवात मोठ्या प्रमाणावर पतंगप्रेमींनी सहभाग घ्यावा, असे आवाहन एमटीडीसीच्या वतीने करण्यात आले आहे.

माळशेज घाटातील एमटीडीसीच्या रिसॉर्ट ठिकाणी हा महोत्सव पार पडणार आहे.

सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळेत महोत्सव पार पडणार आहे. या महोत्सवात सामील होण्यासाठी 50 रुपये मोजावे लागणार आहेत.

या महोत्सवात मांजा आणि पतंगाचे स्टॉल असणार आहे.

पतंगबाजी करताना अनेकदा धारधार मांज्यामुळे पक्षांना जखम होते. तसेच काहीवेळा पक्षांना जीवाला मुकावे लागते.

त्यामुळे मांज्यामुळे पक्षांना काही धोका होऊ नये याचीही काळजी घेण्यात येणार आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून या पतंग महोत्सवात प्रतिबंध असलेल्या मांजा या महोत्सवात वापरता येणार नाही.

महोत्सवाचे वैशिष्टय

हा पतंग महोत्सव जरा हटके असणार आहे. या पतंग महोत्सवात विना मांजाच्या पतंगाचे तसेच ड्रोन पतंगाचं समावेश करण्यात आला आहे.

अशा प्रकारचा वेगळा महोत्सव होत आहे. त्यामुळे या महोत्सवाला भरभरुन प्रतिसाद मिळेल, अशा विश्वास एमटीडीसीच्या विश्वास काळे यांनी व्यक्त केला.

या पतंग महोत्सवात येणाऱ्यांना स्थानिक खाद्यपदार्थांची चव चाखता येणार आहे. या 3 दिवसांच्या महोत्सवात महिला बचतगटातील महिलांद्वारे खाद्यपदार्थ बनवले जाणार आहेत.

तसेच या महोत्सवात ग्रामीण भागातील कलाकारांनी तयार केलेले कलाकृतींचे स्टॉल देखील असणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *