Fri. Jun 21st, 2019

पाहा ड्रोनच्या नजरेतून मालवणचे विहंगम रूप

0Shares

तळकोकणात नव्या पर्यटन हंगामाची सुरुवात झाली आहे, त्यामुळे नेहमी प्रमाणेच पर्यटनाचा केंद्रबिंदू असलेल्या मालवणमध्ये पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे.

सिंधुदुर्गातील मालवण हे नेहमीच पर्यटनाचे केंद्रबिंदू असल्यामुळे तळकोकणात आल्यानंतर पर्यटक मालवणला हमखास भेट देतात. पर्यटक दिवसभर येथील मनमोहक निसर्गाची मजा लुटत असतात.

मात्र सूर्य मावळल्यानंतर वेळ कसा घालवावा याची चिंता नेहमीच पर्यटकांना असते. आता यापुढे मात्र पर्यटकांची ही चिंता दूर झालीये. कारण मालवणचे रात्रीचे सौंदर्य देखील तुम्हाला अनुभवता येणार आहे. रॉक गार्डन, चिवला बीच आणि मालवण जेटी परिसर आकर्षक तसेच मनमोहक विद्युत रोषणाईने उजळून निघालाय. मालवण नगरपंचायतीने यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे.

मालवणमधील रॉक गार्डन, चिवला बीच तसेच जेटीचे हे रात्रीचे सौंदर्य पर्यटकांना अधिकच भुरळ घालत आहे. 

पर्यटकांना यापुढे मालवण शहरातील पर्यटन स्थळांचे रात्रीचे सौंदर्य देखील अनुभवता येणार आहे. याचीच झलक दाखवणारे हे दृश्य…

kokan22.jpg

 

kokan23.jpg

 

malvan21.jpg

 

kokan20.png

 

kokan19.jpg

ड्रोनच्या नजरेतील मालवण शहराच्या या दृश्यांनी तुम्हाला देखील नक्कीच भुरळ घातली असेल. चला तर मग कधी येताय मालवणला? मालवणचे हे रात्रीचे विहंगम रूप अनुभवायला.

 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: