मालवणचे वराडकर होणार आयर्लंडचे पंतप्रधान
जय महाराष्ट्र न्यूज, मालवण
मालवण तालुक्यातील वराड गावचे सुपुत्र आणि आयर्लंडचे विद्यमान समाजकल्याण मंत्री लिओ अशोक वराडकर यांना पंतप्रधानपदाची संधी चालून आली आहे.
37 वर्षीय लिओ आयर्लंडचे सर्वांत तरुण मंत्री आहेत. पंतप्रधान एन्डा केनी यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर वराडकर आता पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार मानले जात
आहे.
तर, गृहनिर्माणमंत्री सिमोन कोवेनी हे वराडकरांचे मुख्य स्पर्धक आहेत. आयर्लंडच्या पंतप्रधानपदाची निवडणूक 2 जून रोजी होणार आहे. लिओ यांचा जन्म वराड गावचा
असला तरी गेल्या 37 वर्षांत ते एकदाही जन्मगावी आलेले नाहीत. मात्र, त्यांचे वडील डॉ. अशोक विठ्ठल वराडकर दर दोन वर्षांनी वराडला सपत्नीक भेट देतात.