Thu. May 6th, 2021

निवडणूक आयोगाला ममता बॅनर्जींचा सवाल

राज्यातील काही भागांत कोरोना रुग्णसंख्या वाढण्यावरुन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपाला जबाबदार धरलं आहे. सरकारने सर्वांचं लसीकरण केलं असतं तर देशात कोरोनाची दुसरी लाट आली नसती, असंही त्यांनी म्हटलं आहे. जलपैगुडी येथील सभेत बोलताना ममता बॅनर्जी यांनी भाजपाचं नाव न घेता भाजपावर निशाणा साधला. पश्चिम बंगाल निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपाने उपऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आणले आणि त्यामुळेच राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

ममता बॅनर्जी ह्या डॉक्टर प्रदीप बर्मा यांच्या प्रचारासाठी उपस्थित होत्या. मात्र या प्रचारसभेला प्रदीप बर्मा गैरहजर होते. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ममता बॅनर्जी यांनी प्रचारसभेत बोलताना याबाबत माहिती दिली नाही. प्रदीप बर्मा यांना ताप आणि खोकला असून ते प्रचारसभेत हजर राहू शकत नाहीत असं त्यांनी सांगितलं.

“इतके दिवस तुम्हे कुठे होतात? तुम्ही कोरोना आणलात आणि पळून गेलात. आम्ही सर्व काही ठीक केलं होतं. जर त्यांनी सर्व लोकांचं वेळेत लसीकरण केलं असतं तर कोरोनाचे नवे रुग्ण आढळले नसते,” असं ममता बॅनर्जी यांनी भाजपाचं नाव न घेता म्हटलं.निवडणूक आयोगाने २४ तासांची प्रचारबंदी करण्यावरुन “हिंदू, मुस्लीम आणि अन्य धर्मीयांना एकत्रित मतदान करण्याचे आवाहन करणे ही चूक आहे का, प्रत्येक सभेत आपली खिल्ली उडविणाऱ्या मोदींवर बंदी का नाही?’,असा सवाल ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *