Wed. Oct 5th, 2022

ममता बॅनर्जींनी राज्यपालांना ट्विटरवर केलं ब्लॉक

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना ट्विटरवर ब्लॉक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यपालांना पदावरून हटवण्याची मागणी केली होती, मात्र अद्याप यावर कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे आज मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी राज्यपालांना थेट ब्लॉक केले आहे.

बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर सतत ट्विटच्या माध्यमातून आरोप करत होते. तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तर महात्मा गांधीच्या पुण्यतिथीदिनी राज्यपालांनी ममतांच्या सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, बंगालच्या लोकशाहीला राज्य सरकारने गॅसचे चेंबर बनवले आहे. या राज्यात लोकशाहीचा श्वास कोंडतो आहे. बंगालमध्ये कायद्याचे राज्य नाही तर राज्यकर्त्यांचे कायदा आहे. त्यामुळे येथील संविधानाची रक्षा करणे माझे कर्तव्य आहे, अशी टीका राज्यपालांनी राज्य सरकारवर केली.

राज्यपालांच्या सततच्या ट्विटवरील आरोपांमुळे आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यपाल जगदीप धनखड यांना ट्विटवर ब्लॉक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.