Sun. Jun 20th, 2021

कुलूप तोडून ममतादीदी घुसल्या भाजप कार्यालयात आणि…

लोकसभा निवडणुकांमधील प्रचारात ममता बॅनर्जी आणि मोदींमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या आहेत. त्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि तृणमुल काँग्रेसमध्ये संघर्ष पेटल्याचे दिसून आले. या संघर्षात दिवसेंदिवस वाढच होत आहे. उत्तर २४ परगणा जिल्ह्यात असणाऱ्या कार्यालयावरून देखील या दोन्ही पक्षात वाद सुरू आहे. हे कार्यालय तृणमूलचे असल्याचा दावा इकडून करण्यात येत आहे. तर भाजपाकडूनही तसाच दावा होत आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वत: हजेरी लावत भाजप कार्यालयाचे कुलूप तोडले आहे.

नेमकं प्रकरण काय?

उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील तृणमुल काँग्रेसच्या कार्यालयावर भाजपने कब्जा केलाय.

असा दावा बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

या कार्यालयासाठी भाजपा आणि तृणमुल काँग्रेसमध्ये वाद सुरू झाले आहेत.

नैहाटीमध्ये सभेला संबोधित केल्यानंतर ममता बॅनर्जी भाजप कार्यालयात पोहोचल्या.

त्यांच्यासमोरचं भाजप कार्यालयाचे कुलूप तोडून कार्यालयात प्रवेश केला आहे.

या कार्यालयातील भगवा रंग आणि कमळ चिन्ह देखील हटवण्यात आले.

ममता यांनी स्वतः पक्षाचे चिन्ह या कार्यालयात रेखाटले आणि त्या ठिकाणी तृणमुल काँग्रेस असे लिहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *